पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज सोलापूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नीलम नगर, सोलापूर या शैक्षणिक संस्थेला एकनाथ शिक्षक स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा सचिव श्री. उमेश कल्याणी सर, श्री. गिरीमल बुगडे सर व दीपक तोडकरी यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी संस्थापक श्री. कुंभार ए. जी. सर, मुख्याध्यापक श्री. रविशंकर कुंभार सर तसेच इतर सहशिक्षकांशी संवाद साधण्यात आला. मंगेश चिवटे सरांनी मागील दोन वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर, हक्कांवर आणि न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती देणाऱ्या ‘परिचय पत्रकांचे’ वाटप करण्यात आले.
‘शिक्षकदूत’ म्हणून शिक्षण क्षेत्रासाठी मंगेश चिवटे सरांनी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती यावेळी उपस्थित शिक्षक बांधवांना देण्यात आली.
या संवादादरम्यान सर्व शिक्षकवृंदाने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत मंगेश चिवटे सरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला. शिक्षकांच्या अडचणी, समस्या आणि हक्कांसाठी मंगेश चिवटे सर सदैव कटिबद्ध आहेत, याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
उपस्थित सर्व आदरणीय शिक्षक बांधवांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल, विश्वासाबद्दल आणि दिलेल्या स्नेहाबद्दल मंगेश चिवटे सरांच्या वतीने मनःपूर्वक आभार!