पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज सोलापूर येथील श्री यल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित-वालचंद कला आणि विज्ञान महाविद्यालय,अशोक चौक,सोलापूर या शैक्षणिक संस्थेला एकनाथ शिक्षक स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा सचिव श्री.उमेश कल्याणी सर व दीपक तोडकरी यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी उपस्थित उपप्राचार्य श्री.अनुप म्हेत्रे सर व सहशिक्षक,शिक्षिका यांच्याशी संवाद साधून, मंगेश चिवटे सरांनी मागील २ वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आणि हक्कांवर केलेल्या उल्लेखनीय कामांच्या ‘परिचय पत्रकांचे’ वाटप करण्यात आले. शिक्षकदूत म्हणून सरांनी शिक्षण क्षेत्रासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती उपस्थित शिक्षक बांधवांना देण्यात आली.
या संवादा दरम्यान सर्व शिक्षक वृंदाने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत सरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मंगेश चिवटे सर सदैव कटिबद्ध आहेत, याची ग्वाही यावेळी देण्यात आली.