मंगेश चिवटे यांच्या सामाजिक कार्याचा केंद्रबिंदू म्हणजे रुग्णसेवा. महागड्या उपचारांअभावी उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना तातडीची मदत मिळावी, या उद्देशाने त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या उपक्रमाला शासकीय अधिष्ठान मिळाले.
पुढे एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून हजारो गोरगरीब रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक मदत, रुग्णालयांशी समन्वय, कागदपत्रांची पूर्तता आणि तातडीची कार्यवाही मिळू लागली. त्यांच्या नेतृत्वाखाली या कक्षामार्फत सुमारे ४५० कोटी रुपयांची मदत वितरित होऊन ५०,००० हून अधिक रुग्णांचे प्राण वाचवले गेले, हे त्यांच्या सामाजिक कार्याचे ठोस फलित आहे.
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, पाहिला मजला, नवीन इमारत, मंत्रालय मुंबई.
mangeshchivate.com
Typically replies within minutes
Any questions related to आरोग्यदूत?
WhatsApp Us
Online | Privacy policy
WhatsApp us