पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानिफनाथ कदम सर यांची वैयक्तिक भेट घेण्यात आली.
यावेळी एकनाथ शिक्षक स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा सचिव श्री. उमेश कल्याणी सर, दीपक तोडकरी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान प्राचार्य डॉ. कानिफनाथ कदम सर यांच्याशी विविध शैक्षणिक विषयांवर तसेच शिक्षकांच्या विविध समस्या, अडचणी व न्याय्य मागण्यांबाबत मनमोकळा आणि सकारात्मक संवाद साधण्यात आला.
तसेच मंगेश चिवटे सरांनी मागील दोन वर्षांत शिक्षकांच्या प्रश्नांसाठी, हक्कांसाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती देणाऱ्या ‘परिचय पत्रकांचे’ वाटप करण्यात आले.
या संवादा दरम्यान सरांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत सरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
उपस्थित आदरणीय सरांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल आणि दिलेल्या स्नेहाबद्दल मंगेश चिवटे सरांच्या वतीने मनःपूर्वक आभार!