सोलापूर|३१ ऑगस्ट २०२६

सोलापूर|३१ ऑगस्ट २०२६

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सायन्स विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख श्री.राहुल तपकिरे सर यांची वैयक्तिक भेट घेण्यात आली.
यावेळी एकनाथ शिक्षक स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा सचिव श्री.उमेश कल्याणी सर,दीपक तोडकरी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान श्री.राहुल तपकिरे सर यांच्याशी विविध शैक्षणिक विषयांवर तसेच शिक्षकांच्या विविध समस्या, अडचणी व न्याय्य मागण्यांबाबत मनमोकळा आणि सकारात्मक संवाद साधण्यात आला.
तसेच मंगेश चिवटे सरांनी मागील दोन वर्षांत शिक्षकांच्या प्रश्नांसाठी, हक्कांसाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती देणाऱ्या ‘परिचय पत्रकांचे’ वाटप करण्यात आले.
या संवादा दरम्यान सरांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत सरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
आदरणीय सरांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल आणि दिलेल्या स्नेहाबद्दल मंगेश चिवटे सरांच्या वतीने मनःपूर्वक आभार!

Previous सोलापूर|३१ ऑगस्ट २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -