पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज सोलापूर,सावळेश्वर येथील श्री ब्रह्मनाथ शिक्षण प्रसारक मंडळ हायस्कूल व जूनियर कॉलेज ,सावळेश्वर ता.मोहोळ जि.सोलापूर या शैक्षणिक संस्थेला सदिच्छा भेट देण्यात आली
यावेळी उपस्थित आदरणीय सहशिक्षिका सौ. समता गावडे मॅडम शिक्षिका यांच्याशी संवाद साधून, मंगेश चिवटे सरांनी मागील २ वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आणि हक्कांवर केलेल्या उल्लेखनीय कामांच्या ‘परिचय पत्रकांचे’ वाटप करण्यात आले. शिक्षकदूत म्हणून सरांनी शिक्षण क्षेत्रासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती उपस्थित शिक्षक बांधवांना देण्यात आली.
या संवादा दरम्यान सर्व शिक्षक वृंदाने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत सरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मंगेश चिवटे सर सदैव कटिबद्ध आहेत, याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
उपस्थित सर्व आदरणीय शिक्षक बांधवांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल आणि दिलेल्या स्नेहाबद्दल मंगेश चिवटे सरांच्या वतीने मनःपूर्वक आभार!