सांगली | २५ ऑगस्ट २०२६

सांगली | २५ ऑगस्ट २०२६

मा. श्री खासदार विशाल पाटील साहेबांची सदिच्छा भेट; मंगेश चिवटे यांच्या संदर्भात चर्चा
सांगली येथे मा. श्री खासदार विशाल पाटील साहेबांची मंगेश चिवटे यांच्या प्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेतली. पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश चिवटे इच्छुक उमेदवार आहेत. गेल्या २ वर्षापासून चिवटे यांनी पुणे विभाग मतदार संघ पिंजून काढला असून जिल्ह्यात त्यांचे प्रतिनिधी देखील शिक्षकांसमवेत संवाद साधत आहे.
मंगेश चिवटे हे स्वतः शाळा कॉलेज आणि शिक्षक व संस्था चालकांशी संवाद साधून शिक्षकांच्या अडचणी सोडवत आहे. याच प्राश्वभूमीवर त्यांच्या प्रतिनिधींनी मा. श्री खासदार विशाल पाटील साहेबांची भेट घेऊन मंगेश चिवटे यांच्या उमेदवारी आणि सध्या पुणे विभागासह सांगली जिल्ह्यात सुरु असलेल्या संवादाची माहिती दिली.
यावेळी पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न, शिक्षकांच्या अपेक्षा तसेच आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या हक्कांसाठी, त्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी तसेच सक्षम आणि अभ्यासू नेतृत्व उभे करण्याबाबत विचारविनिमय झाला.
शिक्षकांच्या विविध मागण्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख मा. श्री विशाल पाटील, व्यंगचित्रकार, उद्योजक रोहित कबाडे सर व इतर सहकारी उपस्थित होते.

Previous सोलापूर|२५ ऑगस्ट २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -