शाळा / कॉलेजचे नाव :- कै. सुंदरबाई राठी प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, तुळशीबाग, पुणे.
प्रोफेसर: श्रीमती नीलम खोमणे मॅडम
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ कै. सुंदरबाई राठी प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, तुळशीबाग, पुणे या शैक्षणिक संस्थेला माऊली सर, प्रसाद सूर्याराव सर व जितेश देशमुख सर यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी उपस्थित प्राचार्य: श्रीमती नीलम खोमणे मॅडम व सहशिक्षक यांच्याशी संवाद साधून, मंगेश चिवटे सरांनी मागील २ वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आणि हक्कांवर केलेल्या उल्लेखनीय कामांच्या ‘परिचय पत्रकांचे’ वाटप करण्यात आले. शिक्षकदूत म्हणून सरांनी शिक्षण क्षेत्रासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती उपस्थित शिक्षकांना देण्यात आली.
शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मंगेश चिवटे सर सदैव कटिबद्ध आहेत, याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
उपस्थित शिक्षकांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल आणि दिलेल्या स्नेहाबद्दल मंगेश चिवटे सरांच्या वतीने मनःपूर्वक आभार!