कोल्हापूर | २८ सप्टेंबर २०२६

कोल्हापूर | २८ सप्टेंबर २०२६

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मा. श्री. मंगेशजी चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज विद्या प्रसारक मंडळ कळ आरळे संचलित माध्यमिक विद्यालय, कळ आरळे, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे सदिच्छा भेट देण्यात आली.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कृष्णात बापू गुरव सर यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांवर सकारात्मक संवाद साधण्यात आला.

मंगेश चिवटे सर यांनी मागील दोन वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी व न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, शिक्षकदूत म्हणून शिक्षकांच्या समस्या शासन स्तरावर मांडण्याचे कार्य केले आहे. जुनी पेन्शन योजना, टप्पावाढ, संचमान्यता, वैयक्तिक मान्यता, शाळा व महाविद्यालय मान्यता, अनुदान तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

या भेटीदरम्यान शिक्षकहिताच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना सहकार्य व पाठिंबा देण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous वाई,जि.सातारा। २८ सप्टेंबर २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -