कोल्हापूर |

कोल्हापूर |

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज दादासाहेब अ. मगदूम हायस्कूल, कोल्हापूर येथे सदिच्छा भेट दिली.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बी. सी. वस्त्रद सर यांची सदिच्छा भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर, अडचणींवर तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर सविस्तर संवाद साधण्यात आला.

मंगेश चिवटे सरांनी मागील दोन वर्षांत शिक्षकांच्या प्रश्नांसाठी व न्याय्य हक्कांसाठी केलेल्या उल्लेखनीय कामांची माहिती देत परिचय पत्रकाचे वाटप करण्यात आले. शिक्षकदूत म्हणून शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली.

शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

श्री. बी. सी. वस्त्रद सर यांनी दिलेल्या आपुलकीच्या स्वागताबद्दल व स्नेहपूर्ण संवादाबद्दल मनःपूर्वक आभार!

Previous काण : फलटण, जिल्हा सातारा २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -