*फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी प्राथमिक विद्यालय, ता. फलटण, जि. सातारा* येथे संचालकांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले.
या सहविचार सभेमध्ये विद्यालयातील सर्व शिक्षकांनी सहभाग नोंदविला.यावेळी विविध विषयांवर विचारविनिमय करून शिक्षकांच्या प्रलंबित व महत्त्वाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
चर्चेदरम्यान *आदरणीय चिवटे साहेबांनी आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षक आंदोलनाला पाठिंबा* दर्शविला. तसेच दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती करण्यासाठी *जाहीरनाम्यातील आश्वासनांची अंमलबजावणी करण्याबाबत* भूमिका स्पष्ट करण्यात आली.
तसेच संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून आगामी *शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची मागणी* करण्यात आली.
यावेळी संबंधित शिक्षक व *मुख्याध्यापिका सौ. अनिता राणी कुमार कुचेकर* यांनी संस्थाप्रमुखांच्या आदेशानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे *आश्वासन दिले.