कोल्हापूर | २३ सप्टेंबर २०२६

कोल्हापूर | २३ सप्टेंबर २०२६

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मा. श्री. मंगेशजी चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज आंतरभारती शिक्षण मंडळ, उत्तूर, ता. आजरा संचलित करवीर प्रशाला, विक्रम नगर, कोल्हापूर येथे सदिच्छा भेट देण्यात आली.

यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक जाधव सर यांच्याशी शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत तसेच शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित विषयांबाबत सकारात्मक संवाद साधण्यात आला. यावेळी मंगेश चिवटे सर यांच्या मागील दोन वर्षांतील शिक्षकहितासाठी केलेल्या कार्याची माहिती देत परिचय पत्रकाचे वाटप करण्यात आले.

शिक्षकांच्या जुनी पेन्शन योजना, टप्पावाढ, संचमान्यता, वैयक्तिक मान्यता, शाळा व महाविद्यालय मान्यता, अनुदान तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी झालेल्या सकारात्मक संवादातून शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी मंगेश चिवटे सर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Previous कोल्हापूर | २३ सप्टेंबर २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -