पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मा. श्री. मंगेशजी चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज आझाद शिक्षण मंडळ संचलित श्री सिद्धेश्वर हायस्कूल, टेंबलाईवाडी, करवीर तसेच न्यू श्री सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालय येथे सदिच्छा भेट देण्यात आली.
यावेळी श्री सिद्धेश्वर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. भाग्याशी जाधव तसेच न्यू श्री सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र तुकाराम कोरे यांच्याशी शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत व शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित विषयांबाबत सकारात्मक संवाद साधण्यात आला.
यावेळी मंगेश चिवटे सर यांनी मागील दोन वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी व न्याय्य हक्कांसाठी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. तसेच शिक्षकांच्या जुनी पेन्शन योजना, टप्पावाढ, संचमान्यता, वैयक्तिक मान्यता, शाळा व महाविद्यालय मान्यता, अनुदान तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्याची माहिती देत परिचय पत्रकाचे वाटप करण्यात आले.
या भेटीदरम्यान झालेल्या सकारात्मक संवादातून शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी मंगेश चिवटे सर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.