मंगेशदादा चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात विविध सामाजिक व आरोग्य उपक्रमांचे आयोजन
कोल्हापूर: शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेशदादा चिवटे यांच्या १५ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यात ‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ आणि ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन’ यांच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांद्वारे गरजू, वृद्ध, अनाथ मुले आणि रुग्णांना थेट मदत पोहोचवली जाणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. प्रशांत साळुंखे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने या सर्व लोककल्याणकारी मोहिमेचे नेटके नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात राबवले जाणारे प्रमुख उपक्रम:
रुग्ण व बालकांना मदत: कसबा बावडा सेवा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहे, तसेच शिये येथील एचआयव्ही (HIV) ग्रस्त मुलांना धान्य वाटप केले जाईल.
अनाथ व अंध मुलांसाठी उपक्रम: गडहिंग्लज येथील अनाथ आश्रमातील अंध मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
वृद्धाश्रमांमध्ये आरोग्य तपासणी: निमशिरगाव (शिरोळ) येथील ‘आई’ वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तू, औषध वाटप आणि आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच चोकाक (हातकणंगले) येथील ‘शांतीनिकेतन’ वृद्धाश्रमातही आरोग्य तपासणी व फळे वाटप करण्यात येणार आहे.
क्षयरुग्णांसाठी विशेष मोहीम: कोल्हापूर शहरांतर्गत क्षयरुग्णांना मल्टी व्हिटॅमिन टॉनिक, न्यूट्रिशन सप्लिमेंट, अंडी वाटप, मोफत औषधे, छातीचा मोफत एक्स-रे आणि रक्ताच्या सर्व आवश्यक तपासण्या मोफत करून दिल्या जाणार आहेत.
शैक्षणिक साहित्याचे वाटप: विद्या मंदिर, सावरवाडी या शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावला जाणार आहे.
वाढदिवसाचे कोणतेही भपकेबाज प्रदर्शन न करता, थेट समाजातील शेवटच्या घटकाला मदत करणारे हे उपक्रम राबवून मंगेशदादा चिवटे यांना ‘आरोग्यमय’ शुभेच्छा दिल्या जात आहेत. या मोहिमेसाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जय्यत तयारी करत आहेत.






