कोल्हापूर | २३ सप्टेंबर २०२६

कोल्हापूर | २३ सप्टेंबर २०२६

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मा. श्री. मंगेशजी चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज पंचशील शिक्षण संस्था संचलित श्री त्र्यंबोलीदेवी हायस्कूल, उचगांव येथे सदिच्छा भेट देण्यात आली.

यावेळी श्री त्र्यंबोलीदेवी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर तसेच शिक्षकांशी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित विषयांवर सकारात्मक संवाद साधण्यात आला.

यावेळी मंगेश चिवटे सर यांनी मागील दोन वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आणि न्याय्य हक्कांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच शिक्षकांची जुनी पेन्शन योजना, टप्पावाढ, संचमान्यता, वैयक्तिक मान्यता, शाळा व महाविद्यालय मान्यता, अनुदान, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्याची माहिती देत परिचयपत्रकाचे वाटप करण्यात आले.

या भेटीदरम्यान झालेल्या सकारात्मक संवादातून शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी मंगेश चिवटे सर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Previous कोल्हापूर | २३ सप्टेंबर २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -