पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मा. श्री. मंगेशजी चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज रॉयल इंग्लिश हायस्कूल, उंचगाव येथे सदिच्छा भेट देण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. सुकुमार संकपाल सर यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांबाबत सकारात्मक संवाद साधण्यात आला.
मंगेश चिवटे सर यांनी मागील दोन वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी व न्याय्य हक्कांसाठी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केला असून, शिक्षकांचा ‘शिक्षकदूत’ म्हणून त्यांनी केलेल्या कार्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच जुनी पेन्शन योजना, टप्पावाढ, संचमान्यता, वैयक्तिक मान्यता, शाळा व महाविद्यालय मान्यता, अनुदान तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली.
यावेळी मंगेश चिवटे सरांच्या परिचय पत्रकाचे वाटप करून आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिक्षकांशी संवाद साधण्यात आला.
शिक्षकांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळावे, शिक्षक हिताचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडले जावेत आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक कार्य व्हावे, यासाठी यावेळी सकारात्मक वातावरण निर्माण झाले.