पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार श्री.मंगेश दादा चिवटे यांच्या प्रचारार्थ एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव शेटे सर यांनी आज भू.म. पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, कन्ना चौक येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी संस्थेचे मुख्याध्यापक श्री.गोमू पागुल यांची सदिच्छा भेट घेऊन मंगेश दादा चिवटे यांचे परिचय पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच उपस्थित शिक्षकांशी संवाद साधत मंगेश दादा चिवटे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील कार्याचा आढावा सांगितला.
यावेळी शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली. शिक्षकांच्या प्रश्नांना व अपेक्षांना जाणून घेताना शैक्षणिक क्षेत्रासाठी सातत्याने कार्य करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
“शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या हक्कांसाठी आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या मंगेश दादा चिवटे यांना आपला मतदानरूपी आशीर्वाद द्यावा,”असे आवाहन एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव शेटे सर यांनी यावेळी केले.
या भेटीमुळे शिक्षकांशी संवाद साधण्यासोबतच मंगेश दादा चिवटे यांच्या कार्याची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रचार अभियानाला अधिक गती मिळाली.