पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मा. मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज मैंदर्गी, ता.अक्कलकोट, जि. सोलापूर येथे भेट देण्यात आली.
यावेळी श्री शिवचल्लेश्वर देवस्थान ट्रस्ट,मैंदर्गी येथील श्री.शिवानंद निंबाळ सर, खजिनदार,श्री शिवचल्लेश्वर देवस्थान ट्रस्ट,मैंदर्गी यांनी मंगेश चिवटे सर यांच्या कार्याला सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.
तसेच शिक्षक मतदारांपर्यंत माहिती पोहोचवून आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
शिक्षक बांधवांच्या प्रश्नांना आणि अपेक्षांना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी सुरू असलेल्या या संवादयात्रेला मिळणारे सहकार्य निश्चितच महत्त्वाचे आहे.
सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार!