शाळा / कॉलेजचे नाव :- हुजूरपागा श्रीमती दुर्गाबाई मुकुंदास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय, तुळशीबाग, पुणे.
प्राचार्य: श्रीमती स्मिता पांडे मॅडम
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ हुजूरपागा श्रीमती दुर्गाबाई मुकुंदास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय, तुळशीबाग, पुणे या शैक्षणिक संस्थेला माऊली व जितेश देशमुख सर यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी उपस्थित प्राचार्य: श्रीमती स्मिता पांडे मॅडम व सहशिक्षक यांच्याशी संवाद साधून, मंगेश चिवटे सरांनी मागील २ वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आणि हक्कांवर केलेल्या उल्लेखनीय कामांच्या ‘परिचय पत्रकांचे’ वाटप करण्यात आले. शिक्षकदूत म्हणून सरांनी शिक्षण क्षेत्रासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती उपस्थित शिक्षकांना देण्यात आली.
शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मंगेश चिवटे सर सदैव कटिबद्ध आहेत, याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
उपस्थित शिक्षकांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल आणि दिलेल्या स्नेहाबद्दल मंगेश चिवटे सरांच्या वतीने मनःपूर्वक आभार!