पुणे | २१ सप्टेंबर २०२६

पुणे | २१ सप्टेंबर २०२६

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या प्रचारार्थ नाणे माध्यमिक विद्यालयाला भेट

प्राचार्य नागणे सर यांनी केले स्वागत; शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर संवाद

नाणे-कामशेत, जि. पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार तथा आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सहकाऱ्यांनी नाणे माध्यमिक विद्यालय, नाणे-कामशेत, जि. पुणे येथे भेट दिली.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य नागणे सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भेटीदरम्यान शिक्षक व शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न, शिक्षकांच्या अपेक्षा तसेच विद्यालयातील शैक्षणिक विषयांवर सकारात्मक संवाद साधण्यात आला.

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या शिक्षकांच्या विविध न्याय्य प्रश्नांसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याबाबत यावेळी माहिती देण्यात आली. शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन त्या योग्य पद्धतीने संबंधित स्तरावर मांडण्याबाबतही चर्चा झाली.

शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थांच्या विविध प्रश्नांवर संवाद साधण्याच्या या उपक्रमातून नाणे परिसरातील शिक्षकांच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.

Previous पुणे | २१ सप्टेंबर २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -