पाकणी | सोलापूर | २५ ऑगस्ट २०२६

पाकणी | सोलापूर | २५ ऑगस्ट २०२६

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज सोलापूर पाकणी येथील प्रमोद शिक्षण व समाज विकास मंडळ मोहोळ संचलित श्री नृसिंह विद्यालय,पाकणी,सोलापूर या शैक्षणिक संस्थेला सदिच्छा भेट देण्यात आली
यावेळी उपस्थित आदरणीय मुख्याध्यापक श्री.म्हाळप्पा कोकरे सर व सहशिक्षक यांच्याशी संवाद साधून, मंगेश चिवटे सरांनी मागील २ वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आणि हक्कांवर केलेल्या उल्लेखनीय कामांच्या ‘परिचय पत्रकांचे’ वाटप करण्यात आले. शिक्षकदूत म्हणून सरांनी शिक्षण क्षेत्रासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती उपस्थित शिक्षक बांधवांना देण्यात आली.
या संवादा दरम्यान सर्व शिक्षक वृंदाने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत सरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मंगेश चिवटे सर सदैव कटिबद्ध आहेत, याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
उपस्थित सर्व आदरणीय शिक्षक बांधवांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल आणि दिलेल्या स्नेहाबद्दल मंगेश चिवटे सरांच्या वतीने मनःपूर्वक आभार!

Previous पंढरपूर |सोलापूर | २५ ऑगस्ट

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -