श्री. आनंदराव कवडूजी भांडारकर (रा. नारायण नगर, गोंदिया रोड, आमगाव) यांना पोटाच्या कर्करोगाच्या (Cancer) चौथ्या टप्प्यामुळे उपचारासाठी नागपूर येथील National Cancer Institute मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना तातडीने सुमारे 30 लाख रुपये किंमतीच्या इंजेक्शनची आवश्यकता होती. मात्र सर्वतोपरी प्रयत्न करूनही ते इंजेक्शन उपलब्ध होत नव्हते.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने एवढी मोठी रक्कम उभी करणे शक्य नव्हते. तसेच वेळेवर मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हते. अशा कठीण प्रसंगी मा. डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्याशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी त्वरित पाठपुरावा करून आवश्यक ती व्यवस्था उपलब्ध करून दिली.
यामुळे श्री. आनंदराव भांडारकर यांना वेळेत 30 लाख रुपये किंमतीचे इंजेक्शन मिळाले आणि त्यांच्या उपचारांना मोठा दिलासा मिळाला.
या मोलाच्या सहकार्याबद्दल आनंदराव भांडारकर यांच्या कुटुंबीयांनी मा. डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी त्यांच्या मुलाने भावनिक शब्दांत सांगितले, “माझ्या वडिलांना 30 लाखांचे इंजेक्शन मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मा. डॉ. सुगतदादा चंद्रिकापुरे यांना माझा मनापासून सलाम.”
वेळेवर केलेल्या या मदतीमुळे डॉ. सुगतदादा चंद्रिकापुरे यांनी समाजसेवेचा एक आदर्श निर्माण केला असून, रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात त्यांनी कायमचे स्थान निर्माण केले आहे.