पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मा. श्री. मंगेशजी चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज ज्ञान विज्ञान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशवाडी बीडशेड, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे सदिच्छा भेट देण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जययेश गुंडेकर सर यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर व शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक संवाद साधण्यात आला.
मंगेश चिवटे सर यांनी मागील दोन वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी व न्याय्य हक्कांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला असून, जुनी पेन्शन योजना, टप्पावाढ, संचमान्यता, वैयक्तिक मान्यता, शाळा व महाविद्यालय मान्यता, अनुदान तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे.
यावेळी शिक्षकदूत म्हणून केलेल्या कार्याची माहिती देणाऱ्या परिचय पत्रकाचे वाटप करण्यात आले. शिक्षकांच्या प्रश्नांवर सकारात्मक संवाद साधत शैक्षणिक विकासासाठी आणि शिक्षकहितासाठी पुढील काळातही प्रभावीपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
विद्यालयातील शिक्षकवर्ग व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी मंगेश चिवटे सर यांच्या कार्याचे स्वागत करून शिक्षकहिताच्या या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला.