पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मा. श्री. मंगेशजी चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय, चापोडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे सदिच्छा भेट देण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. बी. कानडे सर यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर व शैक्षणिक क्षेत्रातील विषयांवर सकारात्मक संवाद साधण्यात आला.
मंगेश चिवटे सर यांनी मागील दोन वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी व न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, शिक्षकदूत म्हणून शिक्षकांच्या समस्या शासन स्तरावर मांडण्याचे काम केले आहे. जुनी पेन्शन योजना, टप्पावाढ, संचमान्यता, वैयक्तिक मान्यता, शाळा व महाविद्यालय मान्यता, अनुदान तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे.
या भेटीदरम्यान मंगेश चिवटे सर यांच्या शिक्षकहिताच्या कार्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.