कोल्हापूर | २८ सप्टेंबर २०२६

कोल्हापूर | २८ सप्टेंबर २०२६

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मा. श्री. मंगेशजी चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज शिरोली शिक्षण प्रसारक मंडळ, शिरोली (मा.) संचलित श्री. बाबुराव पुंडलिक पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरोली (मा.), ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे सदिच्छा भेट देण्यात आली.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुरेश दुर्गुळे सर यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर तसेच शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक संवाद साधण्यात आला.

मंगेश चिवटे सर यांनी मागील दोन वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी व न्याय्य हक्कांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला असून, जुनी पेन्शन योजना, टप्पावाढ, संचमान्यता, वैयक्तिक मान्यता, शाळा व महाविद्यालय मान्यता, अनुदान तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे.

यावेळी शिक्षकदूत म्हणून केलेल्या कार्याची माहिती देणाऱ्या परिचय पत्रकाचे वाटप करण्यात आले. शिक्षकहित, शैक्षणिक विकास आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सकारात्मक संवाद व शासन स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Previous खंडाळा,जि.सातारा। २८ सप्टेंबर २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -