भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ आयुर्वेदिक अँड हॉस्पिटल, कोल्हापूर येथे सदिच्छा भेट
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ आयुर्वेदिक अँड हॉस्पिटल, कोल्हापूर येथे सदिच्छा भेट देण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा वैद्यकीय अधीक्षक वैद्य श्री. प्रदीप ढवळे यांची भेट घेऊन विविध शैक्षणिक व शिक्षकांशी संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांचे हक्क, समस्या आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी मंगेश चिवटे सर यांनी शिक्षकांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही दिली.