पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज सोलापूर- केगांव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट एस.पी.एस.पी.एम या शैक्षणिक संस्थेला सदिच्छा भेट देण्यात आली
यावेळी उपस्थित आदरणीय प्रशासकीय अधिकारी श्री.दत्तात्रय नवले सर व सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक श्री.प्रकाश नवले सर यांच्याशी संवाद साधून, मंगेश चिवटे सरांनी मागील २ वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आणि हक्कांवर केलेल्या उल्लेखनीय कामांच्या ‘परिचय पत्रकांचे’ वाटप करण्यात आले. शिक्षकदूत म्हणून सरांनी शिक्षण क्षेत्रासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती सरांना देण्यात आली.
या संवादा दरम्यान आदरणीय प्रशासकीय अधिकारी नवले सर व उपमुख्याध्यापक नवले सर सर यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत सरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मंगेश चिवटे सर सदैव कटिबद्ध आहेत, याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
उपस्थित सर्व आदरणीय प्रशासकीय अधिकारी नवले सर व उपमुख्याध्यापक नवले सरांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल आणि दिलेल्या स्नेहाबद्दल मंगेश चिवटे सरांच्या वतीने मनःपूर्वक आभार!