कागल | ८ ऑक्टोबर २०२६

कागल | ८ ऑक्टोबर २०२६

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मा. श्री. मंगेशजी चिवटे सर यांच्या प्रचारार्थ दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथे सदिच्छा भेट देण्यात आली.

यावेळी प्राचार्य श्री. नंदकुमार कदम सर यांच्याशी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर व प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. मागील दोन वर्षांत मंगेश चिवटे सर यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी व न्याय्य हक्कांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला असून, जुनी पेन्शन योजना, टप्पावाढ, संचमान्यता, वैयक्तिक मान्यता, शाळा-महाविद्यालय मान्यता, अनुदान तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रभावीपणे आवाज उठवला आहे.

यावेळी शिक्षकदूत व परिचय पत्रकाचे वाटप करून मंगेश चिवटे सर यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक संवाद, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि शिक्षकहिताची भूमिका यामुळे मंगेश चिवटे सर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous खटाव,जि.सातारा। ८ ऑक्टोबर २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -