प्रत्तेक महिन्याच्या शेवटी आनंद आश्रम, टेंभीनाका ठाणे येथे दिव्यांग बांधवांसाठी मोफत मॉड्युलर हात / पाय वाटप शिबीराचे आयोजन केले जातात.

Date
March 27, 2026
Time
10:00 - 16:00
Location
आनंद आश्रम, टेबी नाका, ठाणे (प.)

प्रत्तेक महिन्याच्या शेवटी आनंद आश्रम, टेंभीनाका ठाणे येथे दिव्यांग बांधवांसाठी मोफत मॉड्युलर हात / पाय वाटप शिबीराचे आयोजन केले जातात.

*धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त २७ जानेवारी २०२६ रोजी , आनंद आश्रम, टेम्भी नाका येथे दिव्यांग बांधवांसाठी मोफत जयपूर फूट वाटप शिबिराचे आयोजन*

*संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकप्रिय खासदार डॉ श्रीकांत दादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्याचा महायज्ञ*

ठाणे :
एकनाथ हिरक आरोग्य वर्षाच्या निमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आरोग्यदूत फाउंडेशन व रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त दिव्यांग बांधवांसाठी मोफत जयपूर फूट (हात/पाय) वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये जयपूर फूट तसेच बसवा मॉड्युलर पाय यांसारखी उच्च दर्जाची कृत्रिम अवयव साधने दिव्यांग बांधवांना पूर्णपणे मोफत स्वरूपात दिली जाणार आहेत. दिव्यांग नागरिकांना आत्मनिर्भर व स्वाभिमानी जीवन जगता यावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

हे शिबिर मंगळवार, दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत
स्थळ – आनंद आश्रम, टेबी नाका, ठाणे (प.) येथे पार पडणार आहे.

या उपक्रमाचे आयोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मुख्य संकल्पक व कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे तसेच जिल्हाप्रमुख निखिल बुडजडे यांच्या सहकार्याने होणार आहे.

धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श जपत हा मानवतावादी उपक्रम राबवण्यात येत असून, जास्तीत जास्त दिव्यांग नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Previous आरोग्यदूत कार्ड चे वितरण

Leave Your Comment

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -