मंगेश चिवटे यांना महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक-शिक्षकेतर संघटनेचा जाहीर पाठिंबा
पुणे येथे महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक-शिक्षकेतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मा. मंगेश चिवटे यांना जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी संघटनेचे समन्वयक श्री विजय शिरोडकर सर, राज्य प्रवक्ते मा. श्री. विजय चव्हाण सर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ सर यांचीही उपस्थिती होती.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या मंगेश चिवटे सरांच्या भूमिकेला मिळालेला हा पाठिंबा शिक्षक मतदारसंघातील आगामी वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण आणि बळ देणारा ठरत आहे.
शिक्षकांच्या हक्कासाठी… शिक्षकांच्या प्रश्नांसाठी…
एकजूट मंगेश चिवटे सरांच्या पाठीशी!