कोल्हापूर | दि. ३० सप्टेंबर २०२६

कोल्हापूर | दि. ३० सप्टेंबर २०२६

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मा. श्री. मंगेशजी चिवटे सर यांच्या प्रचारार्थ दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सांगरूळ शिक्षण संस्थेचे श्रीराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुडित्रे, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे सदिच्छा भेट देण्यात आली.

यावेळी मुख्याध्यापक/प्राचार्य श्री. संजय डी. पाटील सर यांच्याशी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर तसेच शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक संवाद साधण्यात आला.

मंगेश चिवटे सर यांनी मागील दोन वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी व न्याय्य हक्कांसाठी शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्याची माहिती देत जुनी पेन्शन योजना, टप्पावाढ, संचमान्यता, वैयक्तिक मान्यता, शाळा-महाविद्यालय मान्यता, अनुदान तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सातत्याने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

यावेळी शिक्षकहिताच्या विविध विषयांवर सकारात्मक व सविस्तर चर्चा झाली. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवून त्यांच्या प्रश्नांना शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देत शिक्षकहित, शिक्षणाचा दर्जा आणि शैक्षणिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने पुढे जाण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या सदिच्छा भेटीमुळे शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक संवादाची नवी दिशा मिळाली.

Previous कोल्हापूर | ३० सप्टेंबर २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -