पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मा. श्री. मंगेशजी चिवटे सर यांच्या प्रचारार्थ कुंभि-कासारी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, डी. सी. नरके विद्यानिकेतन पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुडित्रे येथे सदिच्छा भेट देऊन प्राचार्य श्री. डी. एस. चौगले सर यांच्याशी संवाद साधण्यात आला.
यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर व न्याय्य हक्कांवर चर्चा करण्यात आली. मागील दोन वर्षांत मंगेश चिवटे सर यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती देत जुनी पेन्शन योजना, टप्पावाढ, संचमान्यता, वैयक्तिक मान्यता, शाळा-महाविद्यालय मान्यता, अनुदान तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली.
यावेळी शिक्षकदूत व परिचय पत्रकाचे वाटप करण्यात आले. शिक्षकहितासाठी सकारात्मक संवाद साधत शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्न शासन स्तरावर मांडण्यासाठी सहकार्य व पाठिंबा देण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.