पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मा. श्री. मंगेशजी चिवटे सर यांच्या प्रचारार्थ कुंभी-कासारी विद्यानिकेतन, कुडित्रे, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे सदिच्छा भेट देऊन मुख्याध्यापक श्री. दीपक पाटील सर यांच्याशी संवाद साधण्यात आला.
यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर व न्याय्य हक्कांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगेश चिवटे सर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती देण्यात आली.
यावेळी शिक्षकदूत व परिचय पत्रकाचे वाटप करण्यात आले. शिक्षकहित, शैक्षणिक विकास आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सकारात्मक सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.