कोल्हापूर | ३० सप्टेंबर २०२६

कोल्हापूर | ३० सप्टेंबर २०२६

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मा. श्री. मंगेशजी चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आनंदी फार्मसी कॉलेज, कळंबे तर्फ काळे, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे सदिच्छा भेट देऊन प्राचार्य श्री. सुरेश कोळे सर यांच्याशी संवाद साधण्यात आला.

यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर व न्याय्य हक्कांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगेश चिवटे सर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती देण्यात आली.

यावेळी शिक्षकदूत व परिचय पत्रकाचे वाटप करण्यात आले. शिक्षकहित, शैक्षणिक विकास आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सकारात्मक सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Previous कोरेगांव,जि.सातारा। ३० सप्टेंबर २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -