शाळा / कॉलेजचे नाव :- डी ई एस पुणे विद्यापीठ, पुणे
विद्यापीठाचे रजिस्टर :- देशमुख सर
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या ई एस पुणे विद्यापीठ, पुणे
या शैक्षणिक संस्थेला रवींद्र ननावरे सर, राहुल भालेराव सर यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी उपस्थित विद्यापीठाचे रजिस्टर देशमुख सर व सहशिक्षक यांच्याशी संवाद साधून, मंगेश चिवटे सरांनी मागील २ वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आणि हक्कांवर केलेल्या उल्लेखनीय कामांच्या ‘परिचय पत्रकांचे’ वाटप करण्यात आले. शिक्षकदूत म्हणून सरांनी शिक्षण क्षेत्रासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती उपस्थित शिक्षकांना देण्यात आली.
शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मंगेश चिवटे सर सदैव कटिबद्ध आहेत, याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
उपस्थित शिक्षकांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल आणि दिलेल्या स्नेहाबद्दल मंगेश चिवटे सरांच्या वतीने मनःपूर्वक आभार!