पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार माननीय श्री. मंगेश दादा चिवटे यांच्या प्रचारार्थ आज सोलापूर येथील विद्यानिकेतन हायस्कूल येथे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव शेटे सर यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.नवले सर तसेच शिक्षकवृंद यांच्याशी सविस्तर संवाद साधण्यात आला. यावेळी मंगेश दादा चिवटे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील कार्याची माहिती व कार्याचा अहवाल शिक्षकांसमोर मांडण्यात आला. तसेच शिक्षकांच्या विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीस मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी उत्तम प्रतिसाद देत सकारात्मक संवाद साधला. विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये एकूण २२ शिक्षकांची नोंदणी झालेली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव शेटे सर यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना मंगेश दादा चिवटे यांना मतदानरूपी आशीर्वाद देऊन पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली.
शिक्षकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अपेक्षा व प्रश्न जाणून घेण्याच्या माध्यमातून मंगेश दादा चिवटे यांच्या प्रचार अभियानाला यावेळी अधिक बळ मिळाले.