पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मा. श्री. मंगेशजी चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज भाई माधवरावजी बागल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, टेंबलाईवाडी, जिल्हा कोल्हापूर येथे सदिच्छा भेट देण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय आनंदराव पाटील सर यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत तसेच शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
मंगेश चिवटे सर यांनी मागील दोन वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी व न्याय्य हक्कांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला असून, शिक्षकांचा ‘शिक्षकदूत’ म्हणून विविध प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे कार्य केले आहे. यावेळी त्यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या परिचय पत्रकाचे वाटप करण्यात आले.
जुनी पेन्शन योजना, टप्पावाढ, संचमान्यता, वैयक्तिक मान्यता, शाळा व महाविद्यालय मान्यता, अनुदान तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या याबाबत मंगेश चिवटे सर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती देण्यात आली.
यावेळी झालेल्या सकारात्मक संवादातून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहण्याची भूमिका अधोरेखित झाली. शिक्षक हित, शैक्षणिक विकास आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी मा. श्री. मंगेशजी चिवटे सर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.