कोल्हापूर | २३ सप्टेंबर २०२६

कोल्हापूर | २३ सप्टेंबर २०२६

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मा. श्री. मंगेशजी चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज डी. के. व्ही. एन. हायस्कूल, उंचगाव, कोल्हापूर येथे सदिच्छा भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधण्यात आला.

यावेळी शिक्षिका/शिक्षक श्रीमती सुप्रिया निकम यांची भेट घेऊन मंगेशजी चिवटे सर यांच्या मागील दोन वर्षांतील शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी व न्याय्य हक्कांसाठी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या शिक्षकदूत या भूमिकेतून शासन स्तरावर विविध प्रलंबित प्रश्नांसाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती देण्यात आली.

यामध्ये जुनी पेन्शन योजना, टप्पावाढ, संचमान्यता, वैयक्तिक मान्यता, शाळा व महाविद्यालय मान्यता, अनुदान तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या याबाबत मंगेशजी चिवटे सर सातत्याने आवाज उठवत असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी सकारात्मक संवाद साधत शिक्षकांच्या प्रश्नांवर पुढील काळातही सातत्याने काम करण्यासाठी मा. श्री. मंगेशजी चिवटे सर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Previous कोल्हापूर | २४ सप्टेंबर २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -