सोलापूर | 22 सप्टेंबर २०२६

सोलापूर | 22 सप्टेंबर २०२६

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज सोलापूर येथील राष्ट्रविकास शिक्षण संस्था संचलित इंदिरा कन्या प्रशाला ,नवी पेठ, सोलापूर या शैक्षणिक संस्थेला एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष श्री.वैभव शेटे सर यांनी सदिच्छा भेट दिली

यावेळी उपस्थित आदरणीय मुख्याध्यापिका सौ.सुमती प्रभाकर मारडकर व सहशिक्षिका यांच्याशी संवाद साधून, मंगेश चिवटे सरांनी मागील २ वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आणि हक्कांवर केलेल्या उल्लेखनीय कामांच्या ‘परिचय पत्रकांचे’ वाटप करण्यात आले. शिक्षकदूत म्हणून सरांनी शिक्षण क्षेत्रासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती उपस्थित शिक्षक बांधवांना देण्यात आली.

या संवादा दरम्यान मुख्याध्यापिका व सहशिक्षिका यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला.

शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मंगेश चिवटे सर सदैव कटिबद्ध आहेत, याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

उपस्थित सर्व आदरणीय मुख्याध्यापिका व सहशिक्षिका यांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल आणि दिलेल्या स्नेहाबद्दल मंगेश चिवटे सरांच्या वतीने मनःपूर्वक आभार!

Previous सातारा,जि.सातारा। २२ सप्टेंबर २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -