पंढरपूर | २१ सप्टेंबर २०२६

पंढरपूर | २१ सप्टेंबर २०२६

पंढरपूर येथे आज पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेशी संबंधित प्रलंबित प्रश्न, विविध प्रशासकीय अडचणी तसेच कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या याबाबत उपस्थितांनी सविस्तर माहिती मांडली. संबंधित प्रश्न शासन स्तरावर मांडून ते मार्गी लावण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ सर, प्रदेश प्रवक्ते संजय घोडके सर, पंढरपूर तालुकाध्यक्ष स्वप्निल शेगर सर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous पुणे | २१ सप्टेंबर २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -