पुणे | २१ सप्टेंबर २०२६

पुणे | २१ सप्टेंबर २०२६

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या प्रचारार्थ स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलला भेट

प्राचार्या रेणू शर्मा यांनी केले स्वागत; शिक्षकांच्या प्रश्नांवर सकारात्मक संवाद

तळेगाव दाभाडे, जि. पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार तथा आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या समर्थक व सहकाऱ्यांनी स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, तळेगाव दाभाडे, जि. पुणे येथे भेट देऊन शाळेतील शिक्षक व शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर संवाद साधला.

यावेळी शाळेच्या प्राचार्या रेणू शर्मा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भेटीदरम्यान शिक्षकांच्या विविध समस्या, शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न तसेच शिक्षकांच्या अपेक्षा याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

पुणे शिक्षक मतदारसंघातून इच्छुक असलेले आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या सामाजिक, आरोग्य आणि शिक्षक हिताच्या कार्याची माहिती यावेळी उपस्थित शिक्षकांना देण्यात आली. शिक्षकांच्या न्याय्य प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याच्या त्यांच्या भूमिकेबाबतही यावेळी संवाद साधण्यात आला.

शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्याच्या या अभियानाला तळेगाव दाभाडे परिसरात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Previous पुणे | २१ सप्टेंबर २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -