टेंभुर्णीतील फार्मसी महाविद्यालयाला मंगेश चिवटेंची सदिच्छा भेट
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवाद; संस्थापक सचिव डॉ. राजेंद्र बेंदगुडे यांच्याकडून शुभेच्छा
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी सोलापूर जिल्हा दौऱ्यादरम्यान टेंभुर्णी येथील श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च या फार्मसी महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित विषयांवर उपस्थितांशी संवाद साधण्यात आला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांचे प्रश्न योग्य व्यासपीठावर मांडून त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याची भूमिका मंगेश चिवटे यांनी व्यक्त केली.
यावेळी महाविद्यालयाचे संस्थापक सचिव डॉ. राजेंद्र बेंदगुडे सर यांनी दूरध्वनीद्वारे मंगेश चिवटे यांच्याशी संवाद साधत आगामी पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर त्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रासाठी सकारात्मक कार्य करण्यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी फार्मा कॉलेजचे उपाध्यक्ष बाबा येडगे सर यांचे चिरंजीव आकाश येडगे सर, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे अडसूळ सर पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षकांच्या प्रश्नांना प्रत्यक्ष भेटीतून समजून घेऊन त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा संकल्प या भेटीदरम्यान पुन्हा अधोरेखित झाला.