पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज सोलापूर येथील दयानंद शिक्षण संस्था सोलापूर संचलित द.भै.फ.दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर,रविवार पेठ,सोलापूर या शैक्षणिक संस्थेला एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे जिल्हा सचिव श्री.उमेश कल्याणी सर दीपक तोडकरी यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधून, मंगेश चिवटे सरांनी मागील २ वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आणि हक्कांवर केलेल्या उल्लेखनीय कामांच्या ‘परिचय पत्रकांचे’ वाटप करण्यात आले. शिक्षकदूत म्हणून सरांनी शिक्षण क्षेत्रासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती शिक्षकांना देण्यात आली.
या संवादा दरम्यान शिक्षकांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत सरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मंगेश चिवटे सर सदैव कटिबद्ध आहेत, याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
उपस्थित शिक्षकांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल आणि दिलेल्या स्नेहाबद्दल मंगेश चिवटे सरांच्या वतीने मनःपूर्वक आभार!