पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ सदिच्छा भेट
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर येथे सदिच्छा भेट देण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर सर यांची सदिच्छा भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर, अडचणींवर तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर सविस्तर संवाद साधण्यात आला.
यावेळी मंगेश चिवटे सर यांनी मागील दोन वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी व न्याय्य हक्कांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती देण्यात आली. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची भूमिका तसेच शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या कार्याची माहिती देत परिचय पत्रकाचे वाटप करण्यात आले.
शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मंगेश चिवटे सर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
डॉ. आर. बी. भुयेकर सर यांनी दिलेल्या आपुलकीच्या स्वागताबद्दल व सकारात्मक संवादाबद्दल मनःपूर्वक आभार!