जीवनपट

आरोग्यदूत मंगेश चिवटे – परिचय पत्र

मंगेश नरसिंह चिवटे हे महाराष्ट्रातील गोरगरीब, गरजू व पीडित रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेले एक संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम नेतृत्व आहे. मूळ संकल्पना मांडणारे माजी कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, कक्ष प्रमुख – उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष तसेच संस्थापक अध्यक्ष – शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष म्हणून त्यांनी आरोग्यसेवेत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील मूळ रहिवासी असलेल्या मंगेश चिवटे यांचे शालेय शिक्षण करमाळा येथेच झाले. पुढे पुण्याच्या नामांकित एस.पी. कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षणाचे रोपटे अधिक बहरवले. B.Ed, LLB, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील शिक्षण घेत त्यांनी बौद्धिक आणि सामाजिक जाणीव अधिक प्रगल्भ केली. दिल्लीच्या गजबजाटात IAS होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी वाटचाल सुरू केली होती; मात्र लेखणीच्या ताकदीने समाज बदलण्याचा निर्धार त्यांनी केला.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजमनाशी थेट संवाद साधत त्यांनी Star Majha, Jai Maharashtra, SAM, IBN Lokmat या नामांकित वृत्तवाहिन्यांवर प्रभावी व्यासपीठ उभे केले. पत्रकारितेत यश मिळवूनही त्यांचे मन मात्र नेहमीच सामान्य जनतेच्या वेदनांकडे, त्यांच्या प्रश्नांकडे वळलेले राहिले.

याच सामाजिक जाणिवेतून मार्च 2015 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करण्याची दूरदृष्टीपूर्ण संकल्पना त्यांनी मांडली आणि ती प्रत्यक्षात आणली. 3 मार्च 2015 रोजी या योजनेला देवेंद्र फडणवीस साहेब यांचा अधिकृत पाठिंबा मिळाला. पुढे 17 नोव्हेंबर 2017 रोजी तत्कालीन नगरविकास मंत्री व आजचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षची स्थापना करण्यात आली, जी आजही अखंडपणे कार्यरत आहे.

देवदूत

एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर, महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षला पुन्हा नवसंजीवनी देण्याची जबाबदारी मंगेश चिवटे यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी ही जबाबदारी अत्यंत प्रभावी, पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षातून महाराष्ट्रातील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी तब्बल ४५० कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आणि ५०,००० हून अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले.

सध्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख म्हणून कार्यरत असलेले मंगेश चिवटे आजही अहोरात्र गोरगरीब रुग्णांच्या सेवेत झटत आहेत. राजकीय पद, अधिकार किंवा प्रसिद्धीपेक्षा मानवता, करुणा आणि सेवाभाव हेच त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू आहेत.

याचबरोबर मंगेश चिवटे यांनी आरोग्य क्षेत्रापुरतेच न थांबता शिक्षक वर्गासाठीही व्यापक स्वरूपात कार्य सुरू केले आहे. राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या, समस्या व हक्क याबाबत ते सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत असून, शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्नशील आहेत. शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ आहे, या भूमिकेतून त्यांच्या सन्मान, सुरक्षितता व न्याय्य मागण्यांसाठी ते ठामपणे उभे राहिले आहेत.

शिक्षक, शिक्षण व्यवस्था आणि भावी पिढी यांचे भवितव्य अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने पुणे शिक्षक मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची भूमिका ही सेवा, अनुभव आणि विश्वासावर आधारित आहे. आरोग्य आणि शिक्षण — समाजाच्या या दोन मूलभूत आधारस्तंभांसाठी समर्पित कार्य करणारे मंगेश चिवटे हे संवेदनशील, अभ्यासू आणि जनतेच्या विश्वासास पात्र असे नेतृत्व आहे.

म्हणूनच महाराष्ट्रातील लाखो रुग्ण, शिक्षक व सामान्य जनतेसाठी मंगेश चिवटे हे केवळ एक नाव नसून — आरोग्यदूत, शिक्षकांचा विश्वासू आवाज आणि जीवनदायी आशेचे प्रतीक आहेत.

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -