दक्षिण सोलापूर | ०३ ऑक्टोबर २०२६

दक्षिण सोलापूर | ०३ ऑक्टोबर २०२६

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे सर यांच्या प्रचारार्थ आज सोलापूर येथील सोलापूर सोशल असोसिएशन उर्दू हायस्कूल,रंगराज नगर,विडी घरकुल, ता.दक्षिण सोलापूर या शैक्षणिक संस्थेला एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे जिल्हा सचिव उमेश कल्याणी सर,श्री.मल्लिकार्जुन कोरे सर,दीपक तोडकरी यांनी सस्नेह भेट दिली.

यावेळी उपस्थित आदरणीय मुख्याध्यापक श्री.थोटेघर खलील अहेमद सर व इतर शिक्षक यांच्याशी संवाद साधून,मंगेश चिवटे सरांनी मागील २ वर्षांत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आणि हक्कांवर केलेल्या उल्लेखनीय कामांच्या ‘परिचय पत्रकांचे’ वाटप करण्यात आले. शिक्षकदूत म्हणून सरांनी शिक्षण क्षेत्रासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती उपस्थित शिक्षक बांधवांना देण्यात आली.

या संवादा दरम्यान सर्व शिक्षक वृंदाने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत सरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला.

शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मंगेश चिवटे सर सदैव कटिबद्ध आहेत, याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

उपस्थित सर्व आदरणीय शिक्षक बांधवांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल आणि दिलेल्या स्नेहाबद्दल मंगेश चिवटे सरांच्या वतीने मनःपूर्वक आभार!

Previous दक्षिण सोलापूर | ०३ ऑक्टोबर २०२६

Copyright @ Mangesh Chivate. All rights reserved. |

वेबसाइट अभ्यागत -